23.1 C
New York

Narendra Modi : डॉ.मनमोहन सिंग यांचा ‘हा’ विक्रम मोदींनी मोडला

Published:

देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (78th Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. यासह ते माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या विक्रमाला मागे टाकतील. कारण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर (Red Fort, Delhi) सलग दहा वेळा राष्ट्रध्वज फडकवला होता. (Narendra Modi)

मात्र, लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. १९४७ ते १९६३ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते आणि सलग १७ वेळा तिरंगा फडकवला. यानंतर त्यांची कन्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सलग १६ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. (Narendra Modi) यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला संकुलात होणाऱ्या कार्यक्रमासाठी ११ श्रेणींमध्ये १८ हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महिला, शेतकरी, युवक आणि गरीब वर्गातील ४ हजार विशेष पाहुणे असतील. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी या चार वर्गातील लोकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनाही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. (Narendra Modi)

बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी मौन सोडलं, म्हणाल्या…

यंदाच्या 15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकत पीएम नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर विक्रम रचतील. लालकिल्ल्यावर सर्वाधिक तिरंगा फडकावण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. नेहरू यांनी 17 वेळा लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं होतं. तर इंदिरा गांधी यांच्या नावावर 16 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947 ते 1963 दरम्यान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. तर इंदिरा गांधी यांनी 1966 पासून 1976 पर्यंत आणि 1980 ते 1984 पर्यंत सलग पाच वेळा एकूण 16 वेळा लाल किल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित केलं. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2013 अशी सलग दहा वर्ष लालकिल्ल्यावर तिरंगा फडकावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img