18.2 C
New York

Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; कॅप्टन दीपक सिंग शहीद

Published:

श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmirs) डोडा जिल्ह्यात दहशतवादी (Terrorist Attack) आणि भारतीय सैन्यामध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत भारतीय सैन्यातील कॅप्टन दीपक सिंग शहीद झाल्याचे सांगितले जात आहे. शहीद झालेले कॅप्टन 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. सध्या घटनास्थळी दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात असून, लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून, भारतीय सैन्याने परिसरातून एक एम 4 रायफल, कपडे आणि तीन बॅगा जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी जम्मूच्या उधमपूर जिल्ह्याच्या पटनीटॉप आणि डोडा जिल्ह्याच्या असरच्या बॉर्डरवरील जंगलात लपले आहेत. यानंतर असर ऑपरेशन राबवण्यात आलं. मंगळवारी सायंकाळी 7-8 दरम्यान सुरक्षा दल दहशतवादी आराम करीत असलेल्या त्या खोलीत पोहोचले. तेथे दहशतवाद्यां:नी शस्त्र, दारूगोळी ठेवला होता. ते स्वत:च्या जवळ शस्त्र घेऊन झोपले होते. लष्कराच्या कारवाईनंतर दहशतवादी तेथून पळून गेले. मात्र लष्कराने त्यांच्याकडील शस्त्र जप्त केली आहेत. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img