8.3 C
New York

Ajit Pawar : मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण

Published:

मुंबई

अकोल्यामध्ये मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची तोडफोड केली होती. या तोडफोडीत सामील असलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्ताचा या घटनेनंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. अवघ्या 28 वर्षांच्या जयचा मृत्यू झाल्याने पक्षासाठी झटणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चिला जाऊ लागला होता. मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर नांदगावकर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. भेट नेमकी कशासाठी आहे हे कळू शकले नसले तरी या भेटीमागे जुलै महिन्यात घडलेल्या घटना आणि राज ठाकरेंचा आगामी विदर्भ दौरा हे कारण असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर मनसे राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता. यावरुनच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची कार फोडली होती. 30 जुलै रोजी हा प्रकार घडला होता. अकोल्यातील विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला होता ज्यात मालोकरही सहभागी होता. मराठवाडा दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व सोईसुविधांचा नीट वापर केला तर महाराष्ट्रातील जनतेला आरक्षणाची गरजच भासणार नाही असे विधान केले होते. यावरून राज ठाकरे यांचा बराच विरोध झाला होता. राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करणार असून 22 तारखेपासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. मिटकरी यांच्या गाडीची झालेली तोडफोड ही विदर्भातच झाली होती. त्यामुळे या दौऱ्यापूर्वी मनसेचा एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या भेटीला पोहोचला आहे.

संभाजीनगर इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर टीका करत असतानाच राज ठाकरे यांनी अजित पवारांचे कौतुक केले होते. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. अजित पवारांसोबत माझे कितीही मतभेद असले तरी त्यांनी कधीही जातीय राजकारण केले नाही असे कौतुक राज ठाकरे यांनी केले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img