21 C
New York

Advay Hire : अद्वय हिरे तुरुंगातून बाहेर, शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा

Published:

नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून (Nashik District Bank) रेणुकादेवी सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी तब्बल 9 महिन्यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपनेते डॉ. अद्वय हिरे (Advay Hire) यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी-शर्तींच्या आधीन जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरुवारी अद्वय हिरे तुरुंगातून बाहेर आले. गेल्या 9 महिन्यांपासून अद्वय हिरे न्यायालयीन कोठडीत होते.

पाच लाख रुपयांचा जाचमुचलक्यासह आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने अद्वय हिरे यांना जामीन दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अद्वय हिरेंना जामीन मिळाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. शिवसेना नेते तथा मंत्री दादाजी भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याने नाशिकच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img