19.2 C
New York

Doctors Strike : कोलकाता घटनेचे महाराष्ट्रात पडसाद, कुठे कुठे ‘बंद’ राहणार हॉस्पिटल

Published:

मुंबई

कोलकात्यात येथे आरजी कार मेदिल कॉलेजमधील (Kolkata Incident) एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी (Doctors Strike) बंद पुकारला आहे. या आंदोलनाला राज्यातील डॉक्टरांच्या संघटनानी देखील पाठिंबा दिला आहे. तब्बल 8 हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार आहे. संप काळात तातडीच्या सेवा सुरू राहणार असल्याच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेने (MARD) स्पष्ट केले आहे.

कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज, मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेने निवेदनाद्वारे कळविले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेसुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केले होते.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेने आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. हे काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img