23.1 C
New York

Dock Workers : भारतातील बंदर व गोदी कामगारांचा बेमुदत संप

Published:

रमेश औताडे, मुंबई

भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना (Dock Workers) 1 जानेवारी 2022 पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या 7 मिटिंग झाल्या, परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड न झाल्यामुळे नाईलाजाने 28 ऑगस्ट 2024 पासून किंवा त्यानंतर केव्हाही बंदर व गोदी कामगार आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संपावर जातील, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांच्या (Workers Unions) पाचही मान्यताप्राप्त महासंघाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

प्रमुख बंदरातील कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट 2024 रोजी पोर्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे. भारतातील प्रमुख बंदर व गोदी कामगार महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची मिटिंग 7 आणि 8 ऑगस्ट 2024 रोजी व्हीओसी पोर्ट, तुतीकोरीन येथे झाली. या राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत एकमताने प्रमुख बंदरांच्या सर्व गोदी कामगार व पेन्शनर्स यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी बेमुदत राष्ट्रव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img