23.1 C
New York

Revenue Department : नोकरीत कायम करा 18 हजार महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Published:

रमेश औताडे, मुंबई

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी महसूल विभागात (Revenue Department) लिपिक पदावर पदवीधर तरुण तरुणी असे 18 हजार कर्मचारी घेतले. ते आज वयोवृध्द झाले आहेत. काही मृत पावले आहेत. जे काही जिवंत आहेत त्यांनी आझाद मैदानात आम्हाला नोकरीत कायम करा म्हणून आंदोलन सुरू केले आहे.

२५ वर्ष कंत्राटी म्हणून आम्हाला घेतले त्यावेळी कायम करतो म्हणून जर सांगितले नसते तर आम्ही त्यावेळीच दुसरीकडे प्रयत्न केले असते. काहीतरी व्यवसाय केला असता. मात्र सरकारने गोड आश्वासन देत कायम कामगाराप्रमाणे काम करून घेतले. महसूल विभागातील कायम कामगार व आम्ही करत असलेले तेच काम यामध्ये काहीच फरक नसताना आमच्या वेतनात फरक का ? आम्हाला कायम करण्यात काय अडचण आहे ? असा सवाल सांगलीचे महावीर पाटील यांनी केला.

वयोवृध्द झाल्याने वयोमर्यादा संपली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी दरमहा २५ हजार रुपये द्यावे. या व इतर ७ मागण्या बाबत सरकारला निवेदन दिले आहे. सरकारने जर आता गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करू असे असे संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष भारती साळवी व उपाध्यक्ष वैशाली राणे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img