पुणे
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचं (Assembly Elections) राजकारण तापल्याची परिस्थिती आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आहे. अशातच पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत कौतूकाचे गोडवे गायल्याचं दिसून आले आहेत. अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्यावरील ग्रंथाचं इतर भाषेत भाषांतर करण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत असेल, मोदी (PM Narendra Modi) साहेबांकडून शरद पवारसाहेब अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात, त्यामुळे मी शरद पवारांना मदत करणार असल्याचं विनोद तावडेंनी या कार्यक्रमात स्पष्ट केलंय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अण्णाभाऊ साठे-दलित आणि महिलांचे कैवारी ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
विनोद तावडे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठं काम केलं असून चवळवळीत त्यांचं योगदान राहिलंय. अण्णाभाऊंच्या साहित्याला केवळ दलित साहित्य म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय वाटतो, क्रांतीच्या ठिणग्या अण्णाभाऊंच्या लिखाणात पाहायला मिळतात, समाजातील ढोंगीपण त्यांनी लिखाणातून सहजपणे मांडलंय. त्यांचं साहित्य ओटीटीच्या माध्यमातून समाजासमोर आलं पाहिजे, हे साहित्य देशाचं असून देशभरात पोहोचवणं गरजेचं असल्याचं विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय.
विनोद तावडे म्हणाले की, शरद पवार अनेकदा कुठे झोत टाकतात, हे शोधण्यात सगळ्यांचा वेळ जातो. महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ होतं, हे मी जाणीवपूर्वक म्हणतो. पूर्वी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करायचे. मात्र, विरोधक आणि सत्ताधारी तेव्हा एकत्र बोलायचे, जेवायचेदेखील. मात्र, आता हे चित्र दिसत नाही. महाराष्ट्रात दोन तुकाराम होऊन गेले एकाच्या पोवाड्याने आणि दुसऱ्यांच्या अभंगाने महाराष्ट्र प्रगल्भ झाला. अण्णाभाऊ साठे यांच्यावरील या ग्रंथाचं इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत असेन. मोदी साहेबांकडून पवार साहेब अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात. त्यामुळे मी या कामात शरद पवार यांना मदत करेन, असे विनोद तावडे यांनी म्हटले.
विनोद तावडे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केले आहे. या चळवळीत त्यांचं वेगळं योगदान होते. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला केवळ दलित साहित्य म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय वाटतो. क्रांतीच्या ठिणग्या अण्णभाऊ साठेंच्या लिखाणात पाहायला मिळतात. त्यांनी आपल्या लिखाणातून सहजपणे समाजातील ढोंगीपणावर वक्तव्य केलंय. ओटीटीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य समोर आले पाहिजे. जेणेकरुन तरुण पिढीला अण्णाभाऊ साठे कळतील. हे साहित्य केवळ एका दलित वर्गाचं आहे असं न मानता ते देशाचं आहे, असं मानून भारतभर हे साहित्य पोहोचवणे गरजेचे असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.