मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) सडकून टीका केली. जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून सुरू झालं. ते जरांगे पाटलांच्या आडून राजकारण करतात. माझ्या नादी लागू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर आत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केलं. राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विरोधात बोलावं, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांना राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी राज ठाकरेंचा फॅन होता. मात्र आता ते दिल्लीच्या आदेशाचे पालन करतात. लोक आता त्यांना सुपारीबाज पक्ष म्हणत आहेत. पाच वर्षात काय बदललं की तुम्हाला दिल्लीपुढं झुकाव लागत आहे. राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलावे, असं चॅलेंज रोहित पवारांनी दिलं. भाजपला मतांची विभागणी करायची आहे. भाजपने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याबाबतही ठाकरेंनी बोलावं, असेही रोहित पवार म्हणाले.
प्रकाश शेंडगेंचा जरांगे पाटलांना इशारा, म्हणाले…
मराठा आरक्षणावर बोलतांना ते म्हणाल की, सत्तेत असणाऱ्या लोकांमध्ये 220 हून अधिक आमदार आहेत. सर्व अधिकार सत्तेत असलेल्या लोकांना आहेत. सत्तेत असलेले नेते काही मराठा समाजातील नेत्यांना भेटतात. ओबीसी नेत्यांनाही भेटतात. पण याची माहिती लोकांना दिली जात नाही. 16 टक्के आरक्षण दिलं होतं. मात्र, त्यावेळी ते सदावर्ते यांनी हाणून पाडलं. ते फडणवीस यांच्या जवळचे आहेत. राज्यकर्त्यांनी जनतेला खेळवत ठेवलं, अशी टीका रोहित पवारांनी केली.
Rohit Pawar सत्तेतील लोकांनी स्पष्ट भूमिका घ्यावी
सत्तेतील लोकांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. सत्तेतील लोकांनी सांगावं की, आम्हाला जमणार नाही. त्यांना लाडकी खुर्ची जपायची आहे आणि सुपारीबाजांना सांभाळायचं आहे. पण, विधानसभा निवडणुकीत कोणाला खड्यासारखं बाजूला करायचे हे जनता ठरवेल. म्हाडाचे फ्लॅट कार्यकर्त्यांना दिल्याचा प्रकार होत आहे. महायुतीचे सरकार थट्टा करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.