8.7 C
New York

Manoj Jarange Patil : प्रकाश शेंडगेंचा जरांगे पाटलांना इशारा, म्हणाले…

Published:

मुंबई

मराठा आंदोलकांनी (Maratha Protesters) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पाडण्याची भाषा सोडली नाही, तर आम्ही विधानसभा निवडणुकीत ही मराठा समाजेचे एक-दोन नव्हे तर तब्बल 160 आमदार पाडू, मनोज जरांगे यांनी प्रथम 88 उमेदवार उभे करावे आणि त्यापैकी केवळ 8 उमेदवारच निवडून आणावे. त्यानंतर त्यांनी 288 उमेदवार उभे करण्याची भाषा करावी. असा निर्वाणीचा इशारा ओबीसी (OBC) आंदोलक प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांनी या प्रकरणी राज्यभर रान पेटवून सरकार विशेषतः मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांना धारेवर धरले आहे. तसेच त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पाडण्याचाही इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.

मनोज जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करणार असतील तर ओबीसी समाजही राज्यभरातील मराठा आमदारांना पाडण्याची भूमिका घेईल. विशेषतः भुजबळ यांना पाडण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी समाजही तब्बल 160 मराठा आमदार पाडण्याचा प्रयत्न करेल. सरकारने मनोज जरांगे यांच्यापुढे नमते घेत सगेसोयरेचा जीआर काढू नये. सरकारने नव्याने वाटप केलेले कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केली.

सद्यस्थितीत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले आहे. आता राहिलेल्या आरक्षणावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनोज जरांगे शिवगीळ करतात. शिव्यांचा उगम भटक्या वस्त्या-वाड्यांवर होतो. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे. मनोज जरांगे दररोज नवनवीन मागण्या करत आहेत. त्यांनी यापुढेही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह केला तर आमचा त्यांना कायम विरोध असेल असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img