28.9 C
New York

SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या तारीख जाहीर

Published:

पुणे

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे (SSC HSC Exam) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेत होण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेत होणे आवश्यक असते. तसेच अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा मंडळाच्या परीक्षेनंतर होतात. अशा परीक्षांचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल वेळेवर लावावा, अशा विविध गोष्टींचा विचार करून 2025 मध्ये होणारी दहावीची आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 08 ते 10 दिवस आधी घेण्याचा विचार करत मंडळाने तारखा जाहीर केल्या आहेत.

बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यत जाहीर होईल, असा अंदाज बोर्डाने वर्तवला आहे. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.

शाळा-कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. विषयवार सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तारखांवरील हरकती, सूचना [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवण्याबाबतचे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव ओक यांनी केले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम

मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५.

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन

शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा

शुकवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन

सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img