‘बिग बॉस’ आणि भांडणं, वाद (Bigg Boss Marathi) हे समीकरण फारच जुनं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत भांडतानाचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. ‘बिग बॉस’चे घर म्हणजे अनेकदा वाद भांडणासाठचे घर म्हणूनच ओळखले जाते. घरातील प्रत्येक स्पर्धक अंतिम फेरीत आपलं स्थान टिकवण्यासाठी आणि अंतिम फेरीत जाण्यासाठी धडपड करत असतो. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातही अंतिम टप्प्यात जाण्यासाठी स्पर्धकांमध्ये आतापासूनच चढाओढ सुरु झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यासाठी ते एकमेकांना भिडत आहेत. याचाच एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. (Bigg Boss Marathi 5 new promo)
निक्कीने पुन्हा एकदा घरात राडा घातल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या आठवड्याची सुरुवातच भांडणाने झाली आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी तिच्या वस्तुंना पंढरीनाथ यांनी हात लावल्यामुळे चिडलेली पाहायला मिळाली. त्यानंतर तिने सगळ्यांशी भांडण केलं. घरातील सदस्यांचे कपडे फेकले आणि कॅप्टन अंकिता वालावलकरला धक्काबुक्कीही केली. प्रोमोमध्ये पाहायला मिळालं कि, निक्की पंढरीनाथ यांना ओरडून विचारतेय कि, माझ्या वस्तुंना हात का लावला ? त्यावर पंढरीनाथ यांनी मी माझी ड्युटी केली असं सांगितलं. निक्की म्हणते, “ड्युटी करायची, काम करायचं समजलं ना?” तिला उत्तर देताना पंढरीनाथ म्हणाले कि. “तू तुझी ड्युटी करत नव्हतीस म्हणून मी हात लावला. ” त्यानंतर तिने घरातील सगळ्या सदस्यांचे कपडे संपूर्ण रूममध्ये फेकले आणि नंतर तिला जाब विचारायला आलेल्या कॅप्टन अंकिता वालावलकरलाही धक्काबुक्की केली.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये पाहायला मिळालं कि, निक्कीने घरात वाद घातल्यानंतर वैभव पंढरीनाथ यांना तुमच्यामुळेच हे सगळं घडलं असं सांगताना पाहायला मिळाला. त्यावर पंढरीनाथ यांनी मी माझं काम केलं असं उत्तर दिलं पण वैभव म्हणाला “तुम्ही किडे केले म्हणूनच हे झालं.”निक्कीला यावरून आता रितेश भाऊ धक्का देणार कि घरात यावरून काही ड्रामा पाहायला मिळणार हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. मात्र या घरात या नियमाचे अनेकदा उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. निक्की व कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर याआधी एकमेकींना भिडल्या होत्या. त्यामुळे आता या दोघींच्या पुन्हा एकदा भांडण्याने घरात अजून काय कल्ला होणार? ‘बिग बॉस’ या दोघींच्या भांडणात पडणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.