17.2 C
New York

Hindenburg : सेबी प्रमुखांबाबत हिंडेनबर्गच्या ‘या’ दाव्याने पुन्हा खळबळ

Published:

हिंडेनबर्ग संशोधन अहवालात केलेले आरोप सेबीच्या प्रमुखांनी काही प्रमाणात मान्य केले आहेत. हिंडेनबर्गचे असं मत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्याविरुद्ध खळबळजनक खुलासे हिंडेनबर्ग संशोधन अहवालात करण्यात आले असून, अदानी घोटाळ्याशी त्यांच्यासोबत त्यांच्या पतीचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Hindenburg)अदानी समूहाच्या अहवालावर सेबीने कारवाई केली नाही, अहवालात कारण अदानीशी संबंधित संस्थांमध्ये सेबी प्रमुखाची गुंतवणूक असल्याचे थेट म्हणलं आहे.

Hindenburg पैशांची उधळपट्टी

अमेरिकन शॉर्टसेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालातील खुलाशांवर सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी दिलेल्या विधानांवर हिंडेनबर्ग यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हिंडनबर्ग रिसर्चने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये आपल्या नवीन अहवालात आरोप केला आहे की, माधबी आणि धवल बुच यांच्याकडे दोन परदेशी फंडांमध्ये म्हणजेच ऑफशोअर फंडांमध्ये स्टेक आहेत, ज्याचा वापर करून अदानी ग्रुपमध्ये पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, हिंडेनबर्गने पुढे सांगितलं की, सेबीला अदानी समूहाशी जोडलेल्या गुंतवणूक निधीची चौकशी करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं, ज्यामध्ये बुच यांनी स्वत: गुंतवणूक केलेल्या निधीचा समावेश असू शकतो.

जॅकेट,योजना फक्त हवा; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला

Hindenburg मोठ्या बदलांचा फायदा

जेव्हा माधबी बुच या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या, तेव्हा 2019 मध्ये, त्यांचे पती धवल बुच यांना ब्लॅकस्टोनचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्याच ब्लॅकस्टोनला सेबीने REIT नियमांमध्ये केलेल्या मोठ्या बदलांचा फायदा झाला. हिंडेनबर्गने सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचं विधान सोशल मीडिया पोस्टसोबत जोडले आहे.

Hindenburg काय आहे संपूर्ण प्रकरण?

दीड वर्षांपूर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्गने अदानी समूहावर अहवाल प्रसिद्ध करून देशांतर्गत शेअर बाजारात खळबळ उडवून दिली होती. आणि त्यानंतर अनेक महिने अदानी समूहाचे शेअर्स घसरत राहिले. हिंडेनबर्गने दीड वर्षांपूर्वी अदानी समूहाविरोधात जो अहवाल आणला होता, त्याचा निकाल सर्वांनाच माहीत आहे. अदानी समूहाचे शेअर्स 83 टक्क्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे, घसरले आणि समूहाचे मार्केट कॅप 80 अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमी झाले. शेअर बाजार नियामक सेबीने तपासानंतर अदानी समूहाला सर्व आरोपांपासून मुक्त केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img