23.1 C
New York

Vinesh Phogat : हरयाणा सरकार करणार विनेश फोगाटचा सत्कार

Published:

निर्भयसिंह राणे

हरियाणा सरकार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) ला पदक विजेता म्हणून मान्यता देईल, जरी तिला पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये तिच्या 50 किलो गटात सुवर्णपदकाच्या मॅचपूर्वी जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते, असे मुख्यमंत्री नायब सिंग सोनी यांनी गुरुवारी जाहीर केली. “आमची हरयाणाची धाडसी मुलगी, विनेश फोगाटने चमकदार कामगिरी करत ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठली. काही कारणास्तव ती अंतिम फेरीत भाग घेऊ शकली नसली परंतु ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे, “सोनीने X वर पोस्ट करत म्हटल.

“आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगाटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्याला हरियाणा सरकार जे सर्व सन्मान, बक्षीस आणि सुविधा देते ते विनेशला देण्यात येईल, “तो पुढे म्हणाला. क्रीडा धोरणांतर्गत, हरियाणा सरकार ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्यांना 6 कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 4 कोटी रुपये आणि कांस्य पदक विजेत्यांना 2.5 कोटी रुपये बक्षीस देते.

Paris Olympics : भारताची ऑलिम्पिक मोहिम थांबली

गुरुवारी, फोगाटने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली, कारण तिच्यत पुढे कुस्ती चालू ठेवण्याची ताकद नाही. तिने मंगळवारी 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक सामन्यात जाणारी पहिली भारतीय कुस्तीपटू बनून इतिहास रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वजन मर्यादा ओलंडल्याबद्दल विनेश फोगाटला सुवर्णपदक स्पर्धेतून अपात्र ठरवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि तिचे वर्णन “चॅम्पियन्समध्ये चॅम्पियन” असे केले. या धक्क्यातून विनेश फोगाट आणखी पुनरागमन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस 2024 ऑलिंपिकमधील अंतिम फेरीत तिला नुकत्याच झालेल्या आपत्रतेला आव्हान देत कोर्ट ऑफ अर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) कडे अपील दाखल केली आहे. तिच्या आव्हानामध्ये फोगाटने पदक देण्याची विनंती केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img