-5.2 C
New York

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राजकीय आखाड्यात

Published:

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीही सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. (Sanjay Pandey ) त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची फेसबुकवर पोस्ट केली आहे. संजय पांडे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत लढवणार आहेत. त्यांनी स्वतः आपल्या उमेदवारीबाबत घोषणा केली.

मात्र, कोणताही पक्ष सोबत नाही, असंदेखील संजय पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, काल संजय पांडे यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात दर्शन घेतल. त्यानंतर प्रचाराला सुरूवात केल्याचं ते म्हटले आहेत. आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू अशा शब्दांत संजय पांडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे माजी आयुक्त संजय पाडे चर्चेत आले होते. त्यामध्ये त्यांना अटक झाली होती.

ओबीसी एल्गार मेळाव्यातून भुजबळांचे मनोज जरांगेंना आवाहन, म्हणाले…

Sanjay Pandey प्रकरण काय?

संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास आठ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. संजय पांडे यांच्या सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता. याचप्रकरणी संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img