राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा निर्णय कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच आज एका कार्यक्रमात बोलताना महायुतीमध्ये लवकरच जागावाटपाबात निर्णय होणार आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होणार असा विश्वास देखील यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. आज फडणवीस मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणूक एक आव्हान आहे पण कुठलीही निवडणूक एक आव्हानच असते आणि दोन निवडणूक सारखे नसते. जर लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधकांनी आराखडे तयार केले असेल तर त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाही. लोकसभेच्या निकालानंतर आम्ही काही गोष्टींवर काम करत आहोत तसेच राज्यात काही नवीन योजना सुरु केले आहे. ज्याचा परिणाम देखील दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये आव्हान असले तरीही आम्ही ते पेलू शकतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुपारी गँग वर्षा बंगल्यावर बसलीये; फोटो दाखवत राऊतांचा प्रहार
Devendra Fadnavis विरोधकांमध्ये 50 वर्ष अनुभव असलेले नेते
या कार्यक्रमात पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे विरोधक हुशार आहे. त्यांच्याकडे 50 वर्ष राजकीय अनुभव असलेले नेते आहे. त्यांना माहिती आहे महायुतीमध्ये शक्ती स्थान कोण आहे? कोणाला टार्गेट केलं तर काय फायदा होणार याबाबात विरोधकांना माहिती आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विरोधकांकडून माझ्यावर नेहमी टीका होत आहे. राज्यात भाजपची मोठी ताकद आहे म्हणून विरोधक आम्हाला टार्गेट करत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis प्रत्येकाला आपली शक्ती आणि मर्यादा माहिती आहे
तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ज्या पक्षाची जितकी शक्ती आहे त्याला तेवढ्या जागा मिळतील कारण प्रत्येकाला आपली शक्ती आणि मर्यादा माहिती आहे तसेच भाजपला देखील आपली शक्ती आणि मर्यादा माहिती आहे. राजकारणात जास्त जागांची मागणी करावी लागते. राजकारणात तूप मागितली की बंदूक मिळते. महायुतीमध्ये जागावाटपाबात बैठका सुरु झाले आहे. त्यामुळे लवकरच जागावाटपाबाबात निर्णय होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच महाविकास आघाडीमध्ये आमच्यापेक्षा जास्त अवघड झालं आहे. त्यांचा गणित कठीण झालं आहे. तिकडे अनेक मुख्यमंत्री, अनेक नेते तयार झालं आहे. तसेच मागच्या वेळी विधानसभा निवडणुकीत जितके जागांवर आम्ही लढलो त्याच्या आसपास आम्ही या वेळी लढवणार असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 162 जागांवर निवडणूक लढवली होती.