ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाडीवर काल (10 ऑगस्ट रोजी) शेण बांगड्या आणि नारळ फेकल्यानंतर ठाण्यातल्या मनसैनिकांवर आता गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसरीकडे ठाण्याचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांच्या विधानावर बोलताना अविनाश जाधव यांनी म्हणाले की, पुढच्या वेळी तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळेस, मी स्वतः येऊन आंदोलन करीन ते देखील दिवसाढवळ्या. त्यासोबतच शिवसेनाप्रमुख शेण खात असताना मी तिथेच उभा होतो, असे प्रत्युत्तर देखील अविनाश जाधव यांनी राजन विचारे यांना दिले. आता हा वाद इथेच थांबवायचा की आणखी वाढवायचा हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असून त्यांना हवे असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात मनसैनिक त्यांची जागोजागी वाट पाहत आहेत, असं अविनाश जाधव यांनी सांगितले.
Uddhav Thackeray संजय राऊत काय म्हणाले होते?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी (Raj thackrey) मनसेच्या लोकांनी गोंधळ घातला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमचा नेता सुपारी घेऊन बसलाय. अन् तुम्ही उगाच राडा करता? तुमचा राजकीय वापर असा संताप व्यक्त करतानाच केला जात आहे. हे लक्षात ठेवा, असा हल्लाच संजय राऊत यांनी केला. मीडियाशी खासदार संजय राऊत यांनी संवाद साधत होते. असला प्रकार पुन्हा करू नका. नाही तर गडबड होईल. तुमच्याकडून कोणी तरी हा प्रकार करून घेत आहे. ते अहमद शाह अब्दाली हे सर्व घडवून आणत आहेत. त्यांनी मोठी सुपारी घेतली आहे. तुमचा वापर होत आहे. सुपारी घेऊन तुम्हाला तुमचा नेता मारामाऱ्या करायला लावतो. ते योग्य नाही. तुमच्यासाठीही आणि राज्यासाठीही योग्य नाही आहे. तुमचा वापर होतोय हे लक्षात ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.
मनोज जरांगेंचे राज ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले..
Uddhav Thackeray राजन विचारे काय म्हणाले?
, बीडला झालेल्या घटनेचे समर्थन नव्हतंच. महिलांना पुढे करून प्रकार घडला. ठाण्यात याआधी कधीच असं घडले नाही. महिलांना पुढे करून जो प्रकार घडवला तो अतिशय निंदनीय आहे. मर्द असाल तर समोर या…आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही शांत होतो. तुमच्या दम असेल तर तुम्ही पळून का गेलात?, असा सवाल राजन विचारे यांनी उपस्थित केला. अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली, मुंबईवरुन गाडीत बसून, लपून-थपून…अरे काय तुझं, हे करु-ते करु अशी भाषा वापरता…शिवसैनिकाला अशी भाषा वापरू नका, शिवसैनिक कधीही अंगावर यायला तयार असतात, असं आव्हान राजन विचारे यांनी दिलं.
Uddhav Thackeray नेमकं काय घडलं?
राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याची घटना घडली होती. ही गोष्ट मनसेच्या मोठी जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून प्रतिक्रियाही आल्या. खुद्द राज ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया देत, माझ्या नादी लागू नका नाहीतर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलं तर सभाही घेऊ देणार नाहीत असा इशाराच दिला.राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना तशी संधीही मिळाली. शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेकडून शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या.