3.7 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्का! कट्टर शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र

Published:

राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत (Elections 2024) आहेत. याआधीच मनसे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटात जोरदार राडा सुरू झाला आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) बीड दौऱ्यात त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून काल मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वाहनांवर बांगड्या फेकल्या. दोन्ही पक्षांत हे नवं युद्ध सुरू झालेलं असतानाच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि स्व. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना कायमचा जय महाराष्ट्र केला आहे. यानंतर बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात आज या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

काल ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होता. हा मेळावा संपल्यानंतर अनिता बिर्जे यांनी लगेचच आनंदाश्रमात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल आणि शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदेंनीही त्यांचं उत्साहात स्वागत केलं आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या जडणघडणीच्या काळात अनिता बिर्जे यांनी शिवसेनेची महिला आघाडी राज्यभरात पोहोचविण्याचं मोठं काम केलं. धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेलं काम ठळकपणे दाखवण्यात आलं होतं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने सत्ता स्थापन केली.

अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले

या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या या निर्णयाला अनिता बिर्जे यांनी विरोध केला होता. पक्षाच्या पडझडीच्या काळात त्यांनी ठाकरे गटाला साथ देणे पसंत केले. यानंतर उद्धव ठाकरेंनीही उपनेतेपदी त्यांची नियुक्ती केली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत ठाण्यात ठाकरे गटाची मोठी वाताहत झाली होती. यावरही शिवसैनिकांत नाराजी होती. एकनाथ शिंदेच खऱ्या अर्थाने स्व. दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा घेऊन पुढ जात आहेत. या गोष्टी पटल्यामुळेच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे अनिता बिर्जे यावेळी म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीआधी ठाण्यात घडलेल्या या घडामोडी ठाकरे गटाच्या अडचणीत भर टाकणाऱ्या ठरणार असल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img