मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. त्यानंतर काल ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (VijayWadettiwar) यांनी यावर भाष्य केले. राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत, अशी टीका त्यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेविषयी आणि ठाण्यातील राड्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना – मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे. ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. दोन पक्षात भांडण लावून मतांना पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
मनसे-ठाकरे गट वाद आणखी चिघळणार ?
ठाण्यातील घटनेत दोन्ही ठाकरे आहेत. एकमेकांना कोण पुरून उरणार ते पाहावं लागले. मात्र, महाराष्ट्रातील वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे हे राज्य आहे, असं ते म्हणाले. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्याविषयी विचारलं असता वडेट्टीवार म्हणाले की, असं सांगत परमबीर सिंग यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपची मदत घेतली. ते भाजपच्या इशाऱ्यावर बोलतात, हे काही लपून राहिलेलं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar ठाण्यात नेमकं काय घडलं?
ठाकरे यांची काल (रविवारी) ठाण्यातील रंगतान हॉलमध्ये सभा झाली. तेव्हा सभास्थळी मनसैनिकांना राडा केला. मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीवर फुगे मारले. त्यांच्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो आणि शेण फेकलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या.