4 C
New York

Raj thackrey : राऊतांकडून मनसेचा पुन्हा एकदा ‘सुपारीबाज’ म्हणून उल्लेख

Published:

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी (Raj thackrey) मनसेच्या लोकांनी गोंधळ घातला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमचा नेता सुपारी घेऊन बसलाय. अन् तुम्ही उगाच राडा करता? तुमचा राजकीय वापर असा संताप व्यक्त करतानाच केला जात आहे. हे लक्षात ठेवा, असा हल्लाच संजय राऊत यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत होते. असला प्रकार पुन्हा करू नका. नाही तर गडबड होईल. तुमच्याकडून कोणी तरी हा प्रकार करून घेत आहे. ते अहमद शाह अब्दाली हे सर्व घडवून आणत आहेत. त्यांनी मोठी सुपारी घेतली आहे. तुमचा वापर होत आहे. सुपारी घेऊन तुम्हाला तुमचा नेता मारामाऱ्या करायला लावतो. ते योग्य नाही. तुमच्यासाठीही आणि राज्यासाठीही योग्य नाही आहे. तुमचा वापर होतोय हे लक्षात ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut राज ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला नाही’

हे सर्व सुपारी बाज आहेत. कोणती अॅक्शन? काय झालं? कोणी पाहत नाही रात्रीच्या अंधारात हे बघून राडा केला. ही सुपारी गँग आहे. मी कोणत्या पार्टीचं नाव घेत नाही. पण राज्यात अराजकता निर्माण करण्याचं काम सुरू आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही कधीच राज ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला नाही. ती आमच्या पक्षाची भूमिका नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंना धक्का! कट्टर शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र

Sanjay Raut तुमच्यावर जबाबदारी ना?

कोणी अंधारात काही फेकलं असेल तर त्याला शाबासकी देतात, त्याला नामर्दानगी म्हणता? एवढा मोठा ताफा असतो. त्यावेळी हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांवर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ना? तुम्ही अशी भाषा करता?, असा सवाल करतानाच मराठी माणूस एकमेकांच्या विरोधात लढतोय आणि अहमद शाह अब्दाली टाळ्या वाजवत आहेत, असा हल्लाच राऊत यांनी केला.

Sanjay Raut तर तुमच्यासाठी चांगलं नाही

काल जो प्रकार झाला. ते कुणाचे कार्यकर्ते होते? ते अहमद शाह अब्दालीचे कार्यकर्ते होते. बीडमध्ये जो प्रकार झाला. मनसे प्रमुखाच्या गाडीवर कुणी सुपाऱ्या फेकल्या. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. आम्ही त्याप्रकाराशी सहमत नाही. पण काल जो आमच्याकडे काळोखात प्रकार झाला. त्यांना विनंती आहे. असा प्रकार करू नका. तुम्ही या स्तरावर येत असाल तर तुमच्यासाठी ते चांगलं नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img