8.9 C
New York

Maratha Reservation : मनोज जरांगेंचे राज ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले…

Published:

सातारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाचं आंदोलन उग्र केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाला अद्यापही पूर्णपणे यश लाभलेलं नाही. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं विधान केलं होतं. राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांनी आरक्षणाची गरज नाही असे म्हणू नये. कायम आपले विचार जनतेवर लादू नये, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांनी आरक्षणाची गरज नाही असे म्हणू नये. जे त्यांना वैभव मिळाले गोरगरिब जनतेच्या, मराठ्यांच्या जीवावर मिळाले आहे. या श्रीमंतांना आणि एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही, असा टोला जरांगेंनी लगावला.

मनोज जरांगे म्हणाले की, राज ठाकरेंनी या गोरगरिब जनतेची भावना फक्त एकदा जाणून घ्यावी आणि मग तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे की नाही, हे ठरवा, असं जरांगे म्हणाले. विद्यार्थ्यांना विचारा त्यांना आरक्षणाची गरज आहे का, ती जर नाही म्हणाली तर मग तुमचं मत व्यक्त करा. प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही. तुमचे विचार लादू नका, असं जरांगे म्हणाले.

राज ठाकरेंच्या गाड्यांवर सुपारी फेकल्यानंतर दंगलीची भीतीही निर्माण झाली होती. त्यावर मनोज जरंगे म्हणाले, राज्यात कुठंही मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. कुणालाही अडवू नका. कुणाला जाब विचारू नका. विनाकारण गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन त्यांनी मराठा समाजबांधवांना केलं.

राज्यात कुठे पण मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. कुणाला ही अडवू नका. कुणाला जाब विचारू नका. विनाकारण गालबोट लावायचा प्रयत्न करु नका. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकाऱ्यांनी असे आंदोलन करण्यासाठी षडयंत्र चालवल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन करायचा की नाही हा शेवटी त्यांचा विचार आहे. समाजाने इतके दिवस सहन केले. पण ते जर समाजाचे ऐकणार नसतील तर त्यांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगवेगळ्या टोळ्या तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनाविरोधात सर्वात अगोदर येवल्याचा मुकादमाला कामाला लावले, त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्यामार्फत काही जणांमध्ये फूट पाडली. आता त्यांना नारायण राणे यांच्या आडून आंदोलन सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. गरीब मराठ्यांविरोधात हे प्रकार का करत आहेत, असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षणामुळे सत्ताधाऱ्यांना विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी पुन्हा सांगितले. तर मुंबईतील परिस्थितीविषयी आताच भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img