बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) सर्वच अभिनेते माझे मित्र आहेत, पण मी मृत्यू विकणार नाही असं वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. जॉन आपल्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच फिट असतो. बरेचसे चित्रपट त्याच्या शरीरयष्टीमुळे गाजवले आहेत. त्यामुळे तो स्वतः देखील फिट राहतो आणि दुसर्यांना देखील फिट राहण्यास सांगतो. सध्या जॉन बहुप्रतिक्षेत असलेल्या ‘वेदा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी देखील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर जॉन बोलताना पहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जॉनने पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांबद्दल मोठं वक्तव्य केले.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॉन म्हणाला, ‘मी प्रामाणिकपणे माझं आयुष्य जगत आहे. जर मी चांगल्या गोष्टींचं पालन करत असेल तर, मी एक रोल मॉडेल आहे. पण जर मी लोकांसमोर खोट्या गोष्टी मांडत असेल आणि त्यामागे एक वेगळं व्यक्तीमत्व असेल तर लोकं ओळखतील…जॉनच्या या वक्तव्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोक फिटनेसबद्दल बोलतात आणि आपल्या प्रसिद्धीसाठी पान मसाल्याची जाहिरात करतात. मी माझ्या सर्वच अभिनेत्यांवर प्रचंड प्रेम करतो. या ठिकाणी मी कोणाला अपमानित करू इच्छित नाही. मी हे माझ्याबद्दल बोलत आहे. त्यामुळे मी मृत्यू कधीच विकणार नाही. पुढे जॉनने प्रसारमाध्यमांना विचारल देखील की, पान मसाल्याची वार्षिक उलाढाल ४५००० कोटी रुपये आहे. एकीकडे आपण गडगंज संपत्ती कमवायाची आणि दुसरीकडे ‘पान मसालासारखी जाहिरात करून आपण स्वतः लोकांच्या जीवाशी खेळून आपण मृत्यूला आमंत्रण द्यायचं यात काय तथ्य?
अनेक अभिनेत्यांनी अशा जाहिराती केल्या आहेत, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्याने काही अभिनेत्यांची नावे देखील या ठिकाणी घेतली. त्यामुळे या अभिनेत्यानंतर भविष्यात अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. अभिनेता जॉन अब्राहमच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 15 ऑगस्ट रोजी ‘वेदा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात जॉन याच्यासोबत अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘वेदा’ सिनेमा शिवाय अभिनेता ‘द डिप्लोमॅट’, ‘तारिक’ आणि ‘तेहरान’ सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.