सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली (Weather Update) आहे. तर काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. काही (Heavy Rain) जिल्ह्यांत मात्र अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यातच आता हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज (Rain Alert) हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील दोन महिन्यांत अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यापर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला होता.
दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहिले. या पावसाचा फटका नागरिकांनाही बसून जनजीवन विस्कळीत झाले होते. गोदावरी नदीला पूर आल्याने या परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली होती. स्थानिक प्रशासनाने उपाययोजना म्हणून या भागातील दुकाने सुरक्षित ठिकाणी हलवली होती. आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सहा जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. याआधी याच जिल्ह्यांत तुफान पाऊस झाला होता. पुण्यात तर पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.