3.6 C
New York

Amit Shah : सहकारी साखर कारखान्यांवर अमित शाहंचं अजब वक्तव्य

Published:

सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलं आहे. आमचं लग्न शेतकऱ्याशी आणि शेतीशी झालं आहे. (Amit Shah) आम्हाला आमचे कारखाने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवावे लागतील. (Award Ceremony) त्यासाठी पुढच्या दोन वर्षांत कार्यक्षमता वाढवून उलाढाल २५ टक्क्यांनी वाढवण्याचं लक्ष्य ठेवावं, असं मतकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२२-२३ मध्ये साठी जाहीर केलेल्या कार्यक्षमता पुरस्कारांच्या वितरण समारंभात ते बोलत होते.

दिल्लीतील जनपथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये कार्यक्रम झाला. साखर कारखाने जेवढी इथेनॉल निर्मिती आणि ऊस उत्पादन कराल ते सर्व जगात निर्यात करण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. त्यासाठी साखर उद्योगाने दोन वर्षे संयम बाळगावा, असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं.

या पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, गुजरातचे माजी मंत्री ईश्वरभाई पटेल, उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व्यासपीठावर उपस्थित होते. पहिल्या तीन पुरस्कारांचे वितरण अमित शहा यांच्या हस्ते झालं. उर्वरित अठरा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या हस्ते देण्यात आले.

Amit Shah हर्षवर्धन पाटील यांच्या मागण्या

उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करावी
बी-हेवी मोलॅसिस आणि सिरप ज्यूसचे दर वाढवून देण्यात यावे
बी हेवी मोलॅसिस आणि इथेनॉल बंदीवर फेरविचार करण्यात यावा
साखरेच्या ८७ ते ९० लाख टन शिल्लक साठ्यापैकी १० ते २० लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळावी

Amit Shah काय म्हणाले अमित शहा?

आंतरराष्ट्रीय स्थिती लक्षात घेऊन सहकार क्षेत्राचे राष्ट्रीय धोरण निर्धारित करण्याची गरज
कार्यक्षमता वाढवली नाही तर कालबाह्य होण्याची वेळ येईल
बहुआयामी जैविक इंधन उत्पादनाची संयंत्रे लावा.‘एनसीडीसी’मधून हवा तितका निधी मिळेल
महाराष्ट्रातील लोकांचा मागण्या करण्याचा स्वभाव आहे. पैसा कुठून मिळेल?
पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केवळ २६० सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून जगवणे शक्य नाही
इथेनॉल आणि वीज निर्मिती सुरु करावी. इथेनॉलचे उत्पादन मूल्य जास्त असेल तर जास्त दराने इथेनॉल खरेदी केली जाईल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img