23.1 C
New York

Aman Sehrawat : कुस्तीपटू अमन सेहरावतने भारताला दिलं सहावं पदक

Published:

भारतीय कुस्तीपटूंना पदकावीनाच परताव लागेल असं वाटत असतानाच अमन सेहरावतने (Aman Sehrawat) पुन्हा आशा पल्लवीत केल्या आहेत. त्याने पदक जिंकलं आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या रवी दहियाला पात्रता स्पर्धेत २१ वर्षीय अमनने पराभूत केलं होतं. त्यावेळी हा काय पदक आणणार, असाच सूर अनेकांनी आवळला होता. मात्र, त्याने कांस्यपदकाच्या लढतीत प्युएर्तो रोकोच्या डॅरियन क्रूझचे आव्हान सहज परतवलं आणि कांस्यपदक नावावर केलं. (Olympic ) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे कुस्तीतील हे पहिलेच पदक ठरलं. भारताच्या पदकांची संख्या सहा झाली आहे.

अमनने लहानपणीच आपले आई-वडील गमावले आहेत. वयाच्या ११ व्या वर्षी अमन अनाथ झाला. तो १० वर्षांचा असताना त्याची आई कमलेश यांचं डिप्रेशनमुळे निधन झालं. एका वर्षानंतर अमनचे वडील सोमवीर यांनीही हे जग सोडलं. अमनच्या काकांनी त्याची काळजी घेतली. पुरुष गटाच्या पहिल्या लढतीत अमनने नॉर्थ मॅकाडोनियाच्या व्हॅदिमीर इगोरोव्हचा १०-० असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर अल्बेनियाच्या झेलिमखानचे आव्हान होते आणि २०२२च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भारतीय कुस्तीपटूने १२-० असा सहज पराभव केला. मात्र, पुढच्या फेरीत अव्वल मानांकित रेई हिगुचीने १०-० अशा फरकाने भारतीय खेळाडूला पराभूत केलं. त्यामुळे अमनला आज कांस्यपदकाच्या लढतीसाठी खेळावं लागलं.

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला

डॅरियन क्रूझने पॅन अमेरिकन स्पर्धेत २०२२ व २०२३ मध्ये प्युएर्तो रिकोचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकलं होतं. २०२०मध्ये तो अमेरिकेकडून याच स्पर्धेत खेळला होता आणि कांस्य जिंकला होता. त्यामुळे त्याच्यासमोर अमनचा निभाव लागणं अवघडच होतं. पण, अमनने २-१ अशी आघाडी घेऊन सर्वांना अचंबित केलं होतं. मात्र, क्रूझने दोन गुण घेऊन ३-१ अशी आघाडी मिळवली आणि त्याला अमनकडून सडेतोड उत्तर मिळालं. पहिल्या ३ मिनिटांत अमन ६-३ असा आघाडीवर होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img