-2.7 C
New York

Vijay Kadam Death : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

Published:

मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेमा मालिका आणि रंगभूमी गाजवणारे हरहुन्नरी (Vijay Kadam Death) अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराची झुंज देत होते. पण त्यांच्यावरील उपचार यशस्वी ठरले. आणि अखेर आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमी येथे आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज पहाटं निधन झालं आहे. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्व आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 1980 आणि 90 काळात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img