19.7 C
New York

Nitesh Rane : ‘ठाकरे दिल्लीला मुजरा करायला गेले होते’; नितेश राणेंचा टोला

Published:

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections) पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरेंनी नुकताच (Uddhav Thackeray) दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे दिल्लीत मुजरा करायला गेले होते अशी टीका राणेंनी केली.

Nitesh Rane काय म्हणाले नितेश राणे?

उद्धव ठाकरेंचा काल दिल्लीचा (New Delhi) जो दौरा झाला. आता उद्धव ठाकरेंना उबाठा पक्षप्रमुख म्हणू नका. दिल्लीत जाऊन त्याने काँग्रेस नेत्यांचे पाय इतके चाटले आहेत की कदाचित त्याचा जिभेचं हाडच मोडलं असेल अशी शंका मला येते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी देश विदेशातल्या मोठ्यातल्या मोठ्या नेत्याला मातोश्रीत आणून दाखवलं. ते आम्ही पाहिलेलं आहे. त्यांचाच मुलगा आणि नातू अगदी कपडे काढून दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांचे पाय चाटताना आम्ही पाहिलेलं आहे.

पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख केल्याने लोकसभेला फटका?, अजित पवार म्हणाले 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) जे वक्तव्य केलं की उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे (Rahul Gandhi) पाय धुवावेत. यावरुनच कळतं की उद्धव ठाकरे दिल्लीच्या दरबारात मुजरा करायला गेले होते. त्यामुळे येथे येऊन उगाच ताठ माना करू नका. कारण तुमची लायकी काय होती हे महाराष्ट्राने दिल्ली दौऱ्यात पाहिलं आहे, अशी जळजळीत टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
आमचे मुख्यमंत्री दिल्लीला राज्याच्या विकासासाठी जाऊन बसतात तुझ्या मालकासारखं मुजरा करायला जात नाही हा दोघांच्या दौऱ्यात फरक आहे असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला. यांना एवढंही माहीत नाही की बाळासाहेबांनी काँग्रेस विरोधात आवाज उठवून लढा दिला याला शिवसेनाचा इतिहास माहीत नाही. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. कोरोना आहे. ह्यांच्यावर वॅक्सीन म्हणून आमचं सरकार काम करत आहे असेही राणे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांच्या वाहनांचा ताफा अडवला जात आहे. यावरही नितेश राणेंनी भाष्य केलं. कुठलाही कडवट मराठा असे करणार नाही. हे सगळे उबाठाचे महाविकास आघाडीचे आणि तुतारीचे कार्यकर्ते होते. मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत यांनी करू नये. दुसऱ्यांना धमक्या देण्यापेक्षा भाजपला धमक्या देऊन दाखव असे आव्हान नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img