18.9 C
New York

Waqf Act : वक्फ विधेयकाबाबत, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Published:

गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या वक्फ कायद्यात सुधारणा विधायक (Waqf Act) केंद्र सरकारने लोकसभेत (Lok Sabha) मांडल्यानंतर या विधेयकाविरोधात विरोधी पक्षांकडून होणारा विरोध पाहता केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेत या वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजेच जेपीसीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज संसदेत केंद्रीय अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी एकूण 31 सदस्यांच्या नावांची घोषणा केली. लोकसभेच्या 21 तर राज्यसभेच्या 10 सदस्यांचीही नावे जेपीसीमध्ये जाहीर करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज दिली. जेपीसी पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात यासंदर्भातील अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहिती देखील किरेन रिजिजू यांनी दिली.

सरकारकडून या समितीमध्ये या विधेयकाला सर्वात जास्त विरोध करणारे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या देखील समावेश करण्यात आला आहे तसेच काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

केंद्र सरकारची विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात ‘रेल्वे लाईन’

Waqf Act जेपीसीमधील लोकसभा सदस्य

1-जगदंबिका पाल

2-निशिकांत दुबे

3-तेजस्वी सूर्य

4-अपराजिता सारंगी

5-संजय जयस्वाल

6-दिलीप सैकिया

7-अविजित गंगोपाध्याय

8-डी के अरुणा

9-गौरव गोगोई

10-इमरान मसूद

11-मोहम्मद जावेद

12-मौलाना मोइबुल्ला

13-कल्याण बॅनर्जी

14-ए राजा

15-श्रीकृष्ण देवरायालू

16-दिनेश्वर कामयत

17-अरविंद सावंत

18-एम सुरेश गोपीनाथ

19-नरेश गणपत मास्क

20-अरुण भारती

21-असदुद्दीन ओवेसी

Waqf Act जेपीसीमध्ये राज्यसभा सदस्य

1-ब्रिजलाल

2-डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी

3-गुलाम अली

4-डॉ. राधामोहन दास अग्रवाल

5-सय्यद नासिर हुसेन

6-मोहम्मद नदीम उल हक

7-वी विजयसाई रेड्डी

8-एम मोहम्मद अब्दुल्ला

9-संजय सिंग

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img