23.1 C
New York

Bangladesh violence : बांग्लादेशात पुन्हा गोंधळ, सरन्यायाधीशांचा राजीनामा

Published:

बांगलादेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराचे (Bangladesh violence) सत्र सुरूच आहे. पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील बांगलादेशात हिंसाचार सुरुच आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन (Obaidul Hasan) यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

माहितीनुसार, आज (10 ऑगस्ट) आंदोलकांनी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षी बांगलादेशचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हसन हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचेही जवळचे मानले जातात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात होता. माहितीनुसार, बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन शनिवारी संध्याकाळी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांची भेट घेऊन आपला राजीनामा देणार आहे.

‘ठाकरे दिल्लीला मुजरा करायला गेले होते’; नितेश राणेंचा टोला

आंदोलक शांततेत ठिय्या मांडून बसले असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने उच्च न्यायालयाच्या आवारात बांगलादेश लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ओबेदुल हसन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बांगलादेशी मीडियानुसार नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारच्या सल्लागारांपैकी एक असिफ महमूद साजिब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येते आहे. यावेळी ते म्हणाले की, आंदोलकांची मागणी सरन्यायाधीशांसह सात न्यायमूर्तींच्या राजीनाम्याची आहे. मात्र, जिल्हा न्यायालयांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही त्यामुळे आंदोलकांना जिल्हा न्यायालयासमोर उपोषण न करण्याची विनंती केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img