16.7 C
New York

Hindenburg : भारताबाबत हिंडेनबर्गचा पुन्हा इशारा

Published:

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी समूहाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. यावेळी त्यांचं लक्ष्य कोण असेल हे पाहणं महत्वाचं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने 10 ऑगस्ट रोजी सकाळी ‘X’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. (Hindenburg) यामध्ये ‘भारतासाठी लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे.’ त्यानंतर हिंडेनबर्ग पुन्हा एक मोठा अहवाल देणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

Hindenburg अदानी समुहावर आरोप

गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहाच्या हेराफेरीवरून गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे शेअर बाजारात भूकंप झाला होता. अदानी जगातील २ नंबरच्या अब्जाधीश पदावरून थेट ३६ व्या क्रमांकावर गेले होते. यानंतर काही महिन्यांनी पुन्हा अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू लागला होता. अदानी ग्रुपचे बाजारमुल्य ८६ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाले होते. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्चने अदानी समूहावर कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी फसवणूकीचा आरोप केला होता. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला होता.

वक्फ विधेयकाबाबत, मोदी सरकारचा मोठा निर्णय


Hindenburg कुणाचा नंबर?

या प्रकरणी हिंडनबर्गला सेबीने नोटीसही पाठवली होती. हिंडनबर्गने कोटक महिंद्रा बँकेबाबतही असाच खुलासा केला होता. तेव्हा देखील कोटकच्या शेअर मुल्यात मोठी घसरण झाली होती. आता कोणत्या कंपनीचा नंबर लागणार आहे, याची धाकधुक कंपन्यांच्या मालकांबरोबरच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्येही लागलेली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img