18.8 C
New York

Sunita William : सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला

Published:

वाॅशिंग्टन

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स (Sunita William) यांचा अंतराळातील मुक्काम अनिश्चीत काळासाठी लांबला आहे. इलाॅन मस्क यांच्या कंपनीचे स्पेस एक्स स्टारलायनर यान उपलब्ध झाले तर फेब्रुवारी २०२५ मध्ये सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्माेर यांची सुटका हाेऊ शकते, असे नासाने स्पष्ट केले अाहे.

सुनिता विल्यम्स आणि बच विल्माेर हे दाेघे अंतराळवीर ५ जून २०२४ राेजी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे रवाना झाले. आठच दिवसांत ते पृथ्वीवर परतणार हाेते, मात्र त्यांना घेऊन गेलेल्या बाेईंग कंपनीच्या यानात बिघाड झाल्याने त्यांचा अंतराळातील मुक्काम लांबला, ताे आजअखेर लांबलेलाच आहे. आणि आता नासाचे सह प्रशासक केनेथ बाेवेरसाॅक्स यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, अंतराळवीरांना अवकाशात घेऊन गेलेल्या बाेईंग कंपनीच्या यानात बिघाड झाल्याने अंतराळवीरांचा अंतराळातील मुक्काम अनिश्चितकाळासाठी लांबू शकताे. इलाॅन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या यानाची मदत घेऊन अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यासाठी देखील फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

रेडिएशन, मानसिक संतुलनाची समस्या
सध्या सुनिता विल्यम्स आणि बच विल्माेर हे दाेघे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर मुक्कामी आहेत. तिथे मानवी वास्तव्यासाठी आवश्यक सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अगदी व्यायामशाळाही उभारण्यात आली आहे. पण, त्यांना सूर्यापासून निर्माण हाेणाऱ्या रेडिएशनपासून संरक्षण मिळत नाही. शिवाय पृथ्वीवरील वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राचे संरक्षणही मिळत नाही. त्याचा अंतराळवीरांच्या शारिरीक आणि मानसिक आराेग्यावर विपरीत परिणाम हाेऊ शकताे, असे नासाला वाटते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img