4 C
New York

Parambir Singh : परमबीर सिंगांकडून पुन्हा खळबळजनक दावा

Published:

मुंबई

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्ररकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे आदेश दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिला मुलाखत देताना त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु होण्याची शक्यता आहे. तसंच नुकतेच देशमुखांनी आपल्यावर केलेल्या आरोपांवरही परमबरी सिंग यांनी भाष्य केलं आहे.

परमबीर सिंग म्हणाले, माझ्यावर केलेले आरोप बोगस आणि बेछुट आहेत. अनिल देशमुख यांच्या सुपीक कल्पनाशक्तीतून हे आलेले आहेत. त्यांच्या मानसिक स्थितीवर मला थोडीशी चिंता वाटते. कारण अशा प्रकारे मानसिक संतुलन बिघडलेला एक व्यक्ती या राज्याचा गृहमंत्री राहिला आहे. अजूनही एक वरिष्ठ नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे आरोप ते नैराश्यातून करत आहेत की आणखी काय मला माहिती नाही. मला राजकारण जास्त काही कळत नाही. आजपर्यंत मी कधी मीडियासमोर आलो नव्हतो पण आता मला मीडियासमोर यावं लागलं कारण माझ्यावर अनिल देशमुख यांनी पुन्हा आरोप केले आहेत.

मी अनिल देशमुखांविरोधात केलेले 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप खरे होते. कारण माझ्याकडं वैयक्तिक माहिती होती तसंच अधिकाऱ्यांकडूनही मला ही माहिती मिळत होती. अनिल देशमुखही बोलता बोलता म्हणायचे की त्यांना पक्षाकडून पैसे गोळा करायचं टार्गेट होतं. त्यांचं टार्गेट 100 कोटींहून अधिक होतं. जेव्हा ही वसुलीची बाब माझ्या कानावर आली तेव्हा मी तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंना भेटलो, ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काही मंत्र्यांना भेटून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली होती. पण त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं कारण त्यांना याची संपूर्ण माहिती होती. त्यामुळं मला त्यात त्यांना कारवाई करण्यात रस नसल्याचं लक्षात आलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img