-5.2 C
New York

Wayanad Landslide : वायनाडमधील शोध मोहिम अंशत: थांबवली

Published:

केरळच्या वायनाडमध्ये एचानक होत्याचं नव्हत करणारी (Wayanad Landslide) दुर्घटना काही दिवसांपूर्वी घडली. येथे रात्रीत दोनदा भूक्खलन झालं. त्यामध्ये सुमारे 400 लाोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, अनेकांनी प्रसंगावधान राखून पोलीस अधिकारी, बचाव पथकाला फोन केले. मात्र, सर्वानांच सुरक्षित ठिकाणी जाता आलं नाही. (Wayanad Landslide) एका पोलीस अधिकाऱ्याने दोन पर्यटकांना वाचवल्यानंतर अन्य लोकांच्या मदतीसाठी ते पुढे सरकले. परंतु, पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की त्यांना डोळ्यादेखत वाहून जाणारे लोक पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. गेली दहा दिवसांपासून अथक शोध मोहीम सुरू असताना आज लष्कराने अंशत: माघारी जाण्याचा निर्णय घेतला. पीडब्लूडी खात्याचे मंत्री पी. मोहंमद रियास यांनी काही प्रमाणात लष्कर माघार घेत असल्याची घोषणा केली.

वायनाडच्या भूस्खलनाला आठवडा लोटला असून, त्यात असंख्य लोकांचा जीव गेला आहे. अनेकजण बेपत्ता झाले आहेत. मात्र, त्या भीषण रात्रीची आठवण आजही मेप्पादी पोलीस ठाण्याचे एक पोलीस अधिकाऱ्यास त्रास देत आहे. चुरलमला भागातील विनाशकारी भूस्खलनात जीव वाचवताना अपुऱ्या पडलेल्या मदतीची आठवण वेदनादायी ठरत असल्याचं ते म्हणतात. पोलीस अधिकारी जिबलू रेहमान यांनी भूस्खलनानंतर तातडीने कारवाई करत ओडिशाच्या दोन पर्यटकांना ढिगाऱ्याखालून वाचवलं होतं. ते मदतीसाठी आकांत करत होते असंही ते यावेळी म्हणाले.

कोल्हापूरातील ऐतिहासिक वारसा जळून खाक

Wayanad Landslide हतबल झालो होतो

मला आणखी दोन लोक वर अडकल्याचं सांगितलं. मी त्यांना टी शर्ट आणि कोट दिला. तेथे तातडीने आलेल्या स्थानिक तरुणांकडं त्यांना सोपावलं. नंतर मी दोघांच्या शोधार्थ वर गेलो. मोठे भूस्खलन झाल्याचं माझ्या लक्षात आलं. पण तेथे जाता येत नसल्याने सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मला आणखी वरच्या भागाकडे जावे लागले. तेव्हा पाणी वाहत होते आणि त्यात झाडे, चिखल होते. अनेक जणांना डोळ्यादेखत ढिगाऱ्यासह वाहताना पाहिलं. परंतु त्यांना वाचवण्यासाठी काहीच करता येत नव्हत अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आपण पूर्णपणे हतबल झालो होतो असंही रेहमान म्हणतात.

Wayanad Landslide मदतकार्याचा दहावा दिवस

वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनातील मदतकार्याचा आज दहावा दिवस होता. सनराईज व्हॅलीत बेपत्ता लोकांसाठी आज पुन्हा शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी श्‍वान पथकही सामील करण्यात आलं. नियमित शोध मोहीम चुरलमला, मुंडक्कई, समलीमट्टममध्ये सुरूच राहणार आहे. भूस्खलनानंतर १६ मदत छावण्यात १९६८ नागरिक राहत आहेत. पण त्यांना आता स्थानांतरित केले जाणार असून त्यांच्यासाठी भाड्याने फ्लॅट, घर शोधण्याचं काम सुरू झालं आहे. त्यांचे भाडे केरळ सरकारकडून दिले जाणार आहे. सध्या अनेक शाळांत नागरिक राहत आहेत. परंतु, शाळा सुरू करण्यासाठी त्यांना अन्य ठिकाणी नेणं गरजेचं आहे. पुनर्वसनाच्या दुसऱ्या टप्प्यात भाड्याच्या घरातून त्यांना नव्याने निर्माण होणाऱ्या नागरी वसाहतीत कायमस्वरूपी नेण्यासाठी कार्यवाही सुरू होईल, असं केरळ सरकारने सांगितलं. १३८ जणांची यादरम्यान, केरळ सरकारने बेपत्ता यादी जारी केली आहे. लष्कर आणि आपत्कालीन विभागाला चेलियार नदी आणि परिसरात ७ ऑगस्टपर्यतच्या शोध कार्यात १९२ अवयव सापडले आगेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img