26.6 C
New York

Raj Thackeray : बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ

Published:

बीड

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला आहे. राज ठाकरे बीडमध्ये (Beed) येतातच शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

राज ठाकरे आज बीड जिल्ह्यात आले असता, त्यांचं जल्लोषात स्वागत झाल, पण शिवसैनिकांना त्यांना विरोध करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध असल्याचे सांगत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना बाजूला घेतलं. लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन तुम्ही आलाय. मनोज जरांगे पाटलांचा सुंदर आंदोलन सुरू आहे, त्यास तुम्ही विरोध करता. त्यामुळे, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलोय अशा शब्दात गणेश वरेकर यांनी मनसे प्रमुखांचा ताफा अडवल्याचा कारण सांगितलं. तसेच, चले जाव, सुपारी बहाद्दर चले जाव, अशी आमची घोषणा असल्याचंही वरेकर यांनी म्हटलं. तसेच, एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाही यावेळी शिवसैनिक व मराठा बांधवांना केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img