मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तीन दिवसाच्या दिल्ली वारीनंतर मुंबईत आले आहे. मात्र महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री चेहऱ्यावरून वादंग सुरू झाला आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहे. असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सुरू झालेल्या वादावार भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील मतभेद आता तर वरवर दिसताहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले मुख्यमंत्री पदाचा आमचा चेहरा नंतर ठरवला जाईल. यावरून महाविकास आघाडीत विधानसभेत भविष्यात काय वाढलेय हे तुमच्या लक्षात येईल.
संजय राऊत यांच्या विधानावर दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी आपल्या औकातीत बोलावे. त्याच्या बापाचे काय आहे याचा आम्हाला हिशोब मांडावा लागेल. बाप काढणे, औकात काढणे हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला शोभणारे नाही. संजय राऊत भरकटलेला आहे. बेताल बोलणे, कुत्सितपणे बोलणे हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा स्थायीभाव झाला असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.
खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी निधी वाटपाबाबत केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, निधी सर्वांना समान मिळतो. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी हे समन्वयातून दोन्ही उपमुख्यमंत्री निधीचे वाटप करताहेत. निधीची तक्रार कुठेच नाही, असल्यास पक्ष पातळीवर सोडवणूक केली जाते.