भारताचा धडाकेबाज भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) इतिहास रचला आहे. नीरजनं रोप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 32024 मधील भारताचं हे पहिलं रौप्यपदक आहे. सुवर्णपदक नीरजच्या हातून थोडक्यात हुकलं. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. तब्बल 32 वर्षांनी पाकिस्तानचा (Pakistan) ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपला आणि अर्शद नदीमुळे पाकिस्तानच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली.
नीरजच्या यशाने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलेच रौप्य पदक मिळाले आहे. एकूण सहा थ्रोपैकी नीरजचा केवळ दुसरा थ्रो लीगल ठरला. इतर सर्व थ्रो फॉऊल ठरले. त्याचवेळी पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम (Arshad Nadeem) याने नीरज चोप्राचे टोकियो ऑलिम्पिकमधील 87.58 चे रेकॉर्ड मोडून काढत सुवर्ण पदक पटकावले. या कामगिरीनंतर नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
देशासाठी जेव्हाही पदक जिंकतो त्याचा आनंद नक्कीच होतो. पदकाची गोष्ट वेगळी आहे पण सुधारणा करण्याची वेळ आली आहे. ज्या कमतरता राहिल्या आहेत त्यात सुधारणा करू टीमसोबत बसून चर्चा करू. स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. गोल्ड, सिल्व्हर पदकांचा विचार करू नका. खेळाडू जे स्पर्धेत खेळले ते पूर्ण झोकून देऊन खेळले. याच पद्धतीतून बदल होत राहतात प्रत्येक वेळी पदक मिळेलच याची काही गरज नाही. पण पुढील काळात भारताच्या पदकांची संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास नीरजने व्यक्त केला.
भारताच्या हॉकी संघानं केली कमाल, स्पेनचा धुव्वा उडवत जिंकलं कांस्यपदक
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नांत 92.97 मीटरवर भालाफेकला. शेवटच्या फेरीत त्यानं 91.7 मीटर अंतरावर भालाफेक केली. पहिल्या फेरीत त्यानं फाऊल केलं असलं, तरी तिसऱ्या फेरीत त्यानं 88.72 मीटर अंतरावर भालाफेक केली. भारताच्या नीरज चोप्राकडून देशाला सोन्याच्या अपेक्षा होत्या, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर भालाफेक केली. शेवटच्या फेरीत त्यानं 91.7 मीटर अंतरावर भालाफेक केली. पहिल्या फेरीत त्यानं फाऊल केलं असलं, तरी तिसऱ्या फेरीत त्यानं 88.72 मीटर अंतरावर भालाफेक केली. भारताच्या नीरज चोप्राकडून देशाला सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
Neeraj Chopra नदीमच्या भालाफेकीनं पाकिस्तानला तीन दशकांनंतर पदक मिळवून दिलं
अर्शद नदीमच्या भालाफेकीनं कापलेल्या अंतरानं केवळ नवा ऑलिम्पिक विक्रमच निर्माण केला नाही, तर पाकिस्तानला पुन्हा एकदा पदकांच्या रांगेत आणलं आहे. पाकिस्तानचा ऑलिम्पिकमधील पदकांचा इतिहास पाहिला तर पाकिस्ताननं यापूर्वी 1992 मध्ये पदक जिंकलं होतं. त्यानंतर बार्सिलोना ऑलिम्पिक 1992 मध्ये पाकिस्तानी हॉकी पुरुष संघानं कांस्यपदक जिंकलं. पाकिस्तानला एकही पदक मिळालं नव्हतं.
Neeraj Chopra पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्ताननं पटकावलं पहिलं पदक
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला अद्याप एकही पदक मिळालं नव्हतं. या खेळांसाठी त्यांनी सात खेळाडू पाठवलं होतं. यापैकी फक्त अर्शद नदीम पाकिस्तानच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला आहे. पाकिस्ताननं ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 10 पदकं जिंकली असून त्यापैकी तीन सुवर्ण आहेत.