26.6 C
New York

Konkan Youth Foundation : कोकण युवा प्रतिष्ठान घेऊन येत आहे संगीत भजनोत्सव स्पर्धा २०२४

Published:

कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे (Konkan Youth Foundation) गेल्या ८ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त संगीत भजनोत्सव या भजन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. यंदा देखील येत्या १० आणि ११ ऑगस्ट रोजी कोकण युवा प्रतिष्ठान यांच्या तर्फे संगीत भजनोत्सव आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच मंगळागौर या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

येत्या १० ऑगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी पहिल्या सत्रात महिला भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या सत्रात उद्धव गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांच्या सहकार्याने ममता घाग यांच्या मार्गदर्शनात श्री कलामंचातर्फे मंगळागौर खेळाचे सादरीकरण देखील केले जाणार आहे. त्याचसोबत श्रावण सरी ग्रुप आणि मैत्रिण गट देखील सादरीकरण करणार आहेत आणि त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी म्हणजेच रविवारी पुरुषांकरिता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आणि नंतर सायंकाळी पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. अशा पद्धतीने कोकण युवा प्रतिष्ठान मार्फ़त हा नियोजित कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुकांनी आपली उपस्थिती लावावी असे आग्रहाचे निमंत्रण कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

तसेच कोकण युवा प्रतिष्ठान मार्फ़त कोकणातील कला, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग अश्या विविध क्षेत्रातील मंडळींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. त्यात यंदाचे पुरस्काराचे मानकरी आहेत. कोकण समाज रत्न – रमेश शिर्के, कोकण साहित्य रत्न – रामदास खरे , कोकण कृषी रत्न – महेश सप्रे, कोकण क्रीडारत्न – निलेश कुळये, कोकण उद्योगरत्न – अभिजित भगत आणि अशोक शिरसाट, कोकण शिक्षणरत्न – प्रिया मांडवकर, कोकण शौर्यरत्न – अजित मोरे, कोकण कलारत्न – मिलिंद अधिकारी, कोकण रत्न पत्रकारिता – राजेंद्रप्रसाद मसुरकर तसेच कोकण युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत त्यांचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कोकण भूषण पुरस्कार – श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कोकण युवा प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक – धनंजय चाळके, अध्यक्ष- दिनेश मोरे, उपाध्यक्ष- सच्चिदानंद हांदे, सचिव- विराज चव्हाण, खजिनदार- रोहन मोरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img