26.6 C
New York

Paris Olympics 2024: पॅरिसमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे रौप्यपदकावर समाधान

Published:

निर्भयसिंह राणे

पाकिस्तानचा स्टार ॲथलीट अर्शद नदीमने (Arshad Nadeem) गुरुवारी रात्री इतिहास रचला कारण त्याने पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympics 2024) मध्ये सुवर्णपदक जिंकून संपूर्ण जगाला चकित केले आहे. नदीमने त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी आणि भारतातील गतविजेता नीरज चोप्राचा पराभव करून स्टेड डी फ्रांस येथे पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मिटर्सच्या उत्तम थ्रोने ऑलिंपिक विक्रम मोडीत काढला. नदीम या खेळातील पहिला पाकिस्तानी सुवर्ण विजेता आणि 40 वर्षांनंतर पहिला पदक विजेता ठरला आहे.

नीरजने त्याला खडतर झुंज दिली पण 89.45 मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह तो दुसरा क्रमांक मिळवू शकला, जो त्याच्या यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम ठरला. पण अंतिम फेरीत तो त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपासून दूर होता, त्याने 6 प्रयत्नांतून फाऊल फेकले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक पटकावले.

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला रौप्य पदक मिळणार?

टोकियो 2020 च्या सुवर्ण आणि या रौप्यपदकानंतर ट्रॅक आणि फील्डमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. एकंदरीत, कुस्तीपटू सुशील कुमार (2008 आणि 2012 गेम्समध्ये कांस्य आणि रौप्य) नंतर सलग ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय पुरुष आहे. रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये सलग रौप्य पदकांसह पराक्रम गाजवणारी पीव्ही सिंधू ही एकमेव भारतीय महिला आहे.

नदीमचा पावरफुल थ्रोचा प्रयत्न हा खेळातील पुरुषांच्या भालाफेक इतिहासातील सहावा सर्वात लांब फेक होता. याआधीचा ऑलिम्पिक विक्रम नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किलडसेनचा 90.57 मीटर होता, जो 2008 च्या बीजिंग गेम्समध्ये सेट झाला होता. नदीमनेही 91.79 मीटरच्या शेवटच्या थ्रोसह स्टाईलमध्ये साइन ऑफ केलं, जेव्हा इतर कोणताही थ्रोअर 90 मीटरच्या अंकाला स्पर्श करू शकला नाही. अर्शदच्या बळावर पाकिस्तानने पदकतालिकेत भारतालाही मागे टाकले. ते आता त्यांच्या एकमेव पदकासह 53 व्या स्थानावर आहेत, 63 व्या क्रमांकावर असलेल्या भारतापेक्षा 10 स्थानांनी पुढे आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img