23.1 C
New York

Arshad Nadeem: भावनिक विजयाने पाकिस्तानला 32 वर्षांत पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक

Published:

निर्भयसिंह राणे

अर्शद नदीमने (Arshad Nadeem) पॅरिस ऑलिंपिकमधील पुरुषांच्या अंतिम फेरीत 92.97 मीटर भालाफेक करून 32 वर्षांतील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक पाकिस्तानला मिळवून दिले. या यशापूर्वी, पाकिस्तानने वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले नव्हते, 1960, 1968 आणि 1984 मध्ये त्यांनी तीन सुवर्णपदकं फील्ड हॉकीमध्ये जिंकले होते. नदीमने केलेली ही उल्लेखनीय कामगिरी त्याच्या भालाफेकीसाठीच्या संघर्षाची आठवण करून देते.

आपल्या ऐतिहासिक विजयानंतर, पाकिस्तानच्या ध्वजात गुंडाळलेल्या नदीमने आपल्या प्रशिक्षकाला भावनिक मिठी मारली आणि हा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाचव्या स्थानावर असलेला आणि बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा 2022 चा राष्ट्रकुल चॅम्पियन असलेल्या नदीमने पाकिस्तानसाठी आपल्या परफॉर्मेंसचे महत्व व्यक्त केले, “माझ्या प्रशिक्षणाचे आणि कष्टाचे अखेर फळ मिळाले. क्रिकेटप्रमाणेच भालाफेकीतही जोरदार टक्कर होती. पाकिस्तान आणि भारतातील लोक आमची स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक होते,” अर्शद म्हणाला.

Paris Olympics 2024: पॅरिसमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे रौप्यपदकावर समाधान

अर्शदने पॅरिसमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज चोप्रा यांच्यातील मैत्रीपूर्वक स्पर्धेची कबुली दिली. दोन्ही क्रीडापटूंना ही स्पर्धा ॲथलेटिक्सला चालना देण्यासाठी आणि दोन्ही देशांतील तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी फायदेशीर असेल, असं नदीम म्हणाला.

नदीमने आपल्या भविष्यातील आकांक्षा देखील सांगितल्या, आपला ऑलिम्पिक विक्रम मागे टाकण्याची आणि आपली वैयक्तिक सर्वोत्तम 95 मीटरच्या थ्रोपेक्षा पुढे जाण्याची आशा व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img