-1.6 C
New York

Keshavrao Bhosale Theatre : कोल्हापूरातील ऐतिहासिक वारसा जळून खाक

Published:

कोल्हापूरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Theatre) आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागलीये. अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. आज रात्री साडेनऊ ते पाऊने दहाच्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली. हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली. अशा या नाट्यगृहाला रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान आग लागली. (Keshavrao Bhosale Theatre) अचानक लागलेल्या भीषण आगीत नाट्यगृह बेचिराख झालं. आजचं संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. त्याच दिवशी ही दुर्घटना घडल्याने नाट्यरसिकांसह तमाम कोल्हापूरकर हळहळले आहेत.

Keshavrao Bhosale Theatre दुरुस्तीसाठी तात्काळ १० कोटींचा निधी

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारान झाली होती. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणं दुर्दैवी आहे. मात्र, या वास्तूच्या पुन:उभारणीसाठी तात्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

Keshavrao Bhosale Theatre किंमत मोजावी लागली

नाट्यगृहामध्ये पूर्ण लाकडी गॅलरी, खुर्च्यांचे कुशन, सिलिंग, लाकडी साहित्य लगेच पेटलं. शाहू महाराजांचं वैभव पाहता पाहता संपुष्टात आले. या आगीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, नाट्यगृहामध्ये अनावश्यक बदल करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे. दरम्यान, या ठिकाणी चाललेल्या चुकीच्या, बेकायदेशीर कामाबाबत आम्ही आवाज उठवत होतो. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं होते. त्याची किंमत आज अशाप्रकारे मोजावी लागली असं दुःखही त्यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img