8.7 C
New York

Vinesh Phogat : ‘विनेश’वरून राज्यसभेत गदारोळ;विरोधकांकडून वॉक आऊट

Published:

नवी दिल्ली

संसदेत आज अनेक महत्वाची विधेयके सादर होणार (Parliament) आहेत. ज्यामध्ये वक्फ अॅक्टमध्ये संशोधन (Waqf Act) विधेयकाची सर्वाधिक चर्चा आहे. याच दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाटचा मुद्दाही (Vinesh Phogat) चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणाचे पडसाद कालपासून देशभरात उमटत आहेत. संसदही याला (Parliament Session) अपवाद नाही. काल याच मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ झाला होता. आजही राज्यसभेत हा मु्द्दा उपस्थित होताच गोंधळाला सुरुवात झाली. विरोधकांनी आरोपांचा धडाकाच सुरू केला. यामुळे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) कमालीचे नाराज झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वर्तणुकीवर संताप व्यक्त करत त्यांनी काही काळासाठी सभागृह सोडलं. नंतर टीएमसी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहातून वॉक आऊट केले.

संसदेत आज विरोधकांनी पुन्हा विनेश फोगाटचा मुद्दा उपस्थित केला. गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले एकदम असं काय झालं की विनेशला थेट अपात्र घोषित करण्यात आलं पण सरकारनं काहीच केलं नाही याचं कारण आम्हाला समजलंच पाहिजे. खर्गे यांच्या या वक्तव्यानंतर टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आरडाओरडा करत विरोध केला. यावर धनखड मात्र चांगलेच नाराज झाले.

धनखड म्हणाले सभागृहात सभापतींनाच आव्हान देण्यात आलं. माझ्याबरोबर योग्य व्यवहार झाला नाही. त्यामुळे काही काळासाठी मी येथे बसण्यास स्वतः ला सक्षम समजत नाही. विनेशच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे सगळा देशच दुःखी आहे. आता यावर राजकारण तरी करू नका. विनेशला ते सगळं काही मिळेल जे एखाद्या पदकविजेत्या खेळाडूला मिळतं. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आता तरी या मु्द्द्यावर राजकारण करू नका असे धनखड म्हणताच टीएमसी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहातून वॉक आऊट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img