23.1 C
New York

Uddhav Thackeray : दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी-शहावर हल्लाबोल

Published:

नवी दिल्ली

बांगलादेशातील हिंसाचारात आंदोलकांनी हिंदूंवरही हल्ले केले. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारला (Narendra Modi) सल्ला दिला आहे. मी अजून शेख हसीना यांची भेट ठरवली नाही. जगभरात अनेक देश अशांत आहेत. सर्वसामान्य जनता मजबूत असते. तिचा अंत कसा होतो, हे काल आपण पाहिलं. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर (Bangladeshi Hindu) अत्याचार होत असेल, तर ते थांबले पाहिजेत. काल सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात ही माहिती दिली. केंद्र सरकारने ताबडतोब पावले उचलावी. तिथल्या हिंदूंच्या रक्षेची जबाबदारी सरकारची आहे. मोदी-शहांनी बांगलादेशात जावं, हिंदुंवरील अत्याचार थांबवावेत, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, धारावीचा विकास झाला पाहिजे. त्याच्या विकासाच्या आड आम्ही नाहीत. धारावीकरांना त्याच ठिकाणी घरे मिळाले पाहिजे, ही शिवसेना उबाठाची भूमिका आहे. शरद पवार आणि अदानी यांची मैत्री आहे. परंतु अदानी माझेही शूत्र नाहीत. अदानी यांच्याकडून टेंडरच्या बाहेरच्या काही गोष्टी आम्ही होऊ देणार नाही. धारावीच्या लोकांवर अपात्रेताचा शिक्का टाकून त्यांना दुसरीकडे फेकत असला तर चालणार आहे. आमचे सरकार आल्यावर टेंडर बाहेरील सर्व गोष्टी आम्ही रद्द करु. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, मुंबईची विल्हेवाट कोणाला लावू देणार नाही. पवार साहेब मुंबईची वाट लावू देणार नाही, असा आपला विश्वास आहे.

बांगलादेशमधील हिंदूचे संरक्षण करणे नरेंद्र मोदी यांचे काम आहे. बांगलादेशमधील हिंदूवर हल्ले होत असतील तर केंद्र सरकारने पावले उचलावी. शेख हसीना यांना आश्रय देत असतील तर त्या ठिकाणी असलेल्या हिंदूचे संरक्षण करणे तुमचे काम आहे. बांगलादेशमधील हिंदूवर होणारे अत्याचार रोखून दाखवावे. काल सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीत नरेंद्र मोदी नव्हते. श्रीलंका, बांगलादेश, इस्त्रायल हे उदाहरण आहे. त्यावरुन जनता सर्वोच्च आहे. जनतेचे न्यायालय सर्वोच्च आहे. हा एक संदेश गेला आहे. त्यातून धडा घेणे गरजेचे आहे. यामुळे सत्तेत बसणाऱ्या लोकांनी मर्यादा पाळल्या पाहिजे. बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संसदेत आरक्षणावर निर्णय घेतला गेला पाहिजे. कोणी स्वत:ला देवापेक्षा मोठे समजू शकले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीत आलो आहे. कारण त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. त्यामुळे पुढील रणनीती कशी असावी, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा सर्वसंमती व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचे अनेक चेहरे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img