5.2 C
New York

Vinod Kambli : एकेकाळी सचिनशी मैत्री आणि आता दयनीय अवस्था..

Published:

निर्भयसिंह राणे

विनोद कांबळी (Vinod Kambli) हा यापूर्वी अनेकदा त्यांच्या चुकीच्या वर्तवणुकीमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडलेला आपल्याला ऐकायला, वाचायला मिळाले आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू कांबळी सध्या दीर्घ आजाराशी झुंज देत आहे. नुकताच विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये असं दिसते की तो मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेने एका दुचाकीचा आधार घेत चालतोय.. या व्हायरल व्हिडिओमुळे विनोद कांबळी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गेल्या वर्षी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर मुंबई पोलिसांनी त्यांच्या पत्नी अँड्रीया हेविटवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हेविटने त्यांच्या वांद्रेच्या फ्लॅटमध्ये दारूच्या नशेत कूकिंग पॅनने तिला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, विनोद कांबळीवर आयपीसी कलम 324 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पत्नी अँड्रीयावर स्वयंपाकाच्या पॅनचे हॅंडल फेकल्याचा आरोप आहे ज्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली. पण कांबळींचा स्वभाव, दारूचे व्यसन आणि मैदानाबाहेरील वादांमुळे अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. कांबळीला यापूर्वी अनेकदा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला आहे.

Vinod Kambli: सचिनच्या जिवलग मित्रावर आली ही वेळ, व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अटक

विनोद कांबळींला वांद्रे पोलिसांनी दारूच्या नशेत गाडी चालवून दुसऱ्या कारला धडक दिल्याप्रकरणी अटक केली होती. आयपीसीच्या कलम 279, 336 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

1996 मध्ये मॅच फिक्सिंगचे आरोप

कांबळीने भारताच्या तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि इतर काही फलंदाजांवर 1996 च्या विश्वचषकात मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. कांबळी म्हणाला की, श्रीलंकाविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यावेळच्या संघ व्यवस्थापकसह काही भारतीय खेळाडू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात गुंतले होते.

मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी कांबळींला अटक

कांबळी आणि त्यांच्या पत्नी या दोघांवर 2015 मध्ये त्यांच्या घरातील मोलकरणीने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप लावला होता. दाम्पत्याने त्यांच्या मोलकरणीला पैसे मागीतल्यानंतर त्यांना 3 दिवस खोलीत डांबून ठेवले होते. यासाठी कांबळीला अटक सुद्धा करण्यात आली होती, पण नंतर त्यांनी आणि अँड्रीयाने मोलकरणीवर ड्रग्स घेतल्याचा आरोप केल्याने त्यांची सुटका झाली.

सोसायटीच्या गेटवर धडक दिल्यासंदर्भात अटक

सोसायटीचा चौकीदार आणि इतर राहिवाश्यांशी वाद घालत कांबळींला वांद्रे पोलिसांनी एकदा त्यांच्या सोसायटीच्या गेटवर कार आदळल्याबद्दल अटक सुद्धा केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img