नवी दिल्ली
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबाबत (Pooja Khedkar) आणखी एक बातमी समोर आली आहे. दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) पूजा खेडकरने दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे. या प्रकरणात उचित प्राधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान पूजा खेडकरच्या वकिलांनी आयएएस (IAS) पद रद्द करण्याची कोणतीही माहिती युपीएससीने (UPSC) दिली नाही. सरळ प्रेसनोट काढण्यात आली असा युक्तिवाद केला.
पूजा खेडकर यांचं आयएएस पद (UPSC) रद्द केलं होतं तर या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्र पाठवणं गरजेचं होतं असेही वकिलांनी सांगतिले. यावर युपीएससीने प्रतिवाद करत स्पष्ट केले की त्यावेळी पूजा खेडकर नेमक्या कुठे होत्या याची माहिती नव्हती. त्यामुळेच आम्ही सरळ एक पत्रक काढलं होतं. आता पुढील दोन दिवसांत आम्ही पूजा खेडकरला एक मेल आणि त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर माहिती पाठवू असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुनावणीदरम्यान सांगितले. यानंतर उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली.