23.2 C
New York

Supreme Court : आमदार अपात्रता सुनावणी, सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले

Published:

मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता या दोन्ही प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मंगळवारी सुनावणी पार पडली. ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला आव्हान दिले आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटाच्या आमदाराला अपात्र केले नसल्याने दोन्ही गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात या दोन्ही प्रकरणांवर काल एकत्रित सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड चांगलेच संतापल्याने न्यायालयातील वातावरणही चांगलंच तापलं होतं. झालं असं की, गेल्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लेखी बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून दिला होता.

Supreme Court तुम्ही कोर्टाला आदेश देऊ नका?


कालच्या सुनावणी अजित पवार गटाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, निवडणूक येत असल्याने आम्ही शुक्रवार पर्यंत देण्याची हमी दिली. पण तितक्यात ठाकरे गटाचे वकीलांनी, या प्रकरणाला विलंब होत असल्याने न्यायालयाने लवकरात लवकर तारीख देण्याची विनंती केली अशी विनंती केली. त्यावर सरन्यायाधीश चांगलेच संतापले, “कोर्टाला आदेश देऊ नका. आम्ही पुढच्या गुरुवारपर्यंत वेळ दिला आहे. नाहीतर तुम्ही इथे येऊन बसत का नाही आणि तुम्हाला कोणत्या तारखा हव्या आहेत, हे कोर्टाला सांगत नाही?” अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरेंच्या वकिलांचा समाचार घेतला.

मुंबईतील प्रभादेवीत शिंदे गट-ठाकरे गटात राडा

Supreme Court नेमकं काय घडलं न्यायालयात!

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “शिवसेनेची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत. राष्ट्रवादीच्या वकिलांनी पण कागदपत्रे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला तीन आठवड्यांचा वेळ वाढवून दिला आहे. दोन आठवड्यांत राष्ट्रवादीच्या मुख्य वकिलांनी तयारी पूर्ण करावी. तुमचे मुख्य वकील कोण आहेत? असाही प्रश्न त्यांनी विचारला असता त्यावर ‘अद्याप सूचित नाही’ असे राष्ट्रवादीच्या वकीलांनी सांगितले.

यानंतर सरन्यायाधीशांनी “आम्ही दोन मुख्य वकिलांची नावे देतो, असे सांगितले. त्यावर विधानसभा निवडणुका जवळ आल्याने शुक्रवारपर्यंत मुख्य वकिलांची नियुक्ती करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने दिले. हे सर्व सुरू असातनाच शिवसेनेच्या वकिलांनी विचारणा केली असता सरन्यायाधीश पुन्हा वकिलांवर भडकले तुम्ही आम्हाला शिकवू नका. पुढच्या गुरूवारपर्यंत तुम्हाला वेळ दिला आहे. मग आता तुम्हाला कोणत्या तारखा पाहिजेत. हे कोर्ट मास्टरला का सांगत नाही?” सरन्यायाधीशांनी अजित पवार आणि ठाकरेंच्या वकिंलांना अशा संतप्त शब्दांत चांगलंच झापलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img