मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने (Shiv Sena) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा (Mumbai Prabhadevi) एकदा आमने-सामने आले आहेत. होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकार्यांनी प्रभादेवी परिसरात रात्रीच्या वेळेस काढल्यामुळे स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले. फुटपाथवरील होर्डिंग वाद- स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी स्वखर्चातून बसवलेले बोर्ड ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी हटवलं, असा आरोप शिवसेना पदाधिकार्यांनी केला आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी स्वखर्चातून बोर्ड बसवल्याचा दावा शिंदे गटानं (Shinde Group) केला आहे. मात्र, सत्तांतरानंतर इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी होर्डिंग लावत होते. त्यातच ठाकरे गटानं अहुजा टॉवर इथल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह हटवल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या समोर आदिवासी आणि कोळी समाजाच्या बैठकीत गोंधळ
मात्र, सत्तांतरानंतर त्यावर इतर राजकिय पक्षाचे (ठाकरे गट)चे पदाधिकारी होर्डिंग लावत होते. यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही आक्षेप घेऊन, स्थानिक पोलिसांना पत्र व्यवहार करत ही बाब निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री ठाकरेंचे पदाधिकारी मध्यरात्री 11 च्या सुमारास आहुजा टॅावर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह काढून तिथून हटवल्याचं समोर आलं आहे. प्रभादेवी भागात फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस काढल्यानं स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai Prabhadevi नेमकं काय घडलं?
फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाणाचं चिन्ह कापून तिथून पळ काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खडसावत धनुष्यबाण चिन्ह का काढलं? याबाबत जाब विचारला. पण, काहीच उत्तर मिळालं नाही. माहीम पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अखेर शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.