3 C
New York

Eknath Shinde : ..आता, झाड तोडाल तर 50 हजार दंड; शिंदे सरकारचा मोठे निर्णय

Published:

मुंबई

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यात विना परवानगी झाड तोडल्यास 50 हजार दंड भरण्याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यापुढे झाड तोडल्यास 50 हजार रुपयांच दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी 1 हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. त्यामुळे, यापुढे झाडांची कत्तल करताना किंवा झाडे तोडताना होणाऱ्या परिणामाचा विचार करुनच पाऊल उचलायला हवं. विना परवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाच हे मोठ पाऊल उचललं आहे. 

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून एक झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या दंडाची तरतूद करणार शासन निर्णय लवकरच पारीत होईल. तसेच, पुढील आठवड्यात 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस असल्याने हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीही, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवविणार येणार असून अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्यात येईल. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img