23.1 C
New York

BEST : “बेस्ट” दिनादिवशी प्रवासी बसस्टॉपवर ताटकाळत

Published:

रमेश औताडे, मुंबई

काही वर्षापूर्वी बेस्ट (BEST) ही भारतातील एक उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा होती. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि बेस्ट व्यवस्थापनाने बेस्ट सेवा कशी मोडकळीस आणता येते हे यशस्वीपणे दाखवून देत खाजगी कंत्राटदारांचे अविश्वसनीय आणि असुरक्षित जाळे तयार करून प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करण्यास बस स्टॉपवर ताटकाळत सोडले आहे. असा आरोप “आमची मुंबई आमची बेस्ट” (Mumbai Aamchi Mumbai) या संघटनेच्या वतीने संघटनेचे समन्वयक विद्याधर दाते यांनी “बेस्ट” दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई प्रेस क्लब येथे केला.

यावेळी जेष्ठ पत्रकार लेखक राजु परुळेकर व प्राध्यापक ताप्ती मुखोपाध्याय प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना राजु परुळेकर म्हणाले, बॉम्बे ची मुंबई झाली तेव्हापासून मुंबईची दुरवस्था होण्यास सुरवात झाली. मुंबईची लोकसंख्या वाढत चालली अन् बेस्ट बस चे अनेक मार्ग बंद होत गेले व काही विस्तारित होत गेले. आता अडाणी चे लक्ष बेस्टवर अजून कसे गेले नाही ? असे सांगत असतानाच, ते म्हणाले, अडाणीला बेस्ट प्रवासी सेवा याबद्दल काही घेणे देणे नसेल. त्यांचा डोळा हजारो एकर बेस्ट डेपोच्या जमिनीवर असेल.

बेस्टचा ताफा पूर्णपणे सार्वजनिक (बेस्टच्या मालकीचा) केला पाहिजे. सार्वत्रिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध असणे हे वाहतूक नियोजनाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे, बंद केलेले सर्व बस मार्ग पुन्हा सुरू करावेत. सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण सुधारणे हे पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आहे. बसेसची संख्या २००० लोकसंख्येमागे किमान १ बस पर्यंत वाढवावी किमान ६००० बसेस उपलब्ध कराव्यात.अशी मागणी यावेळी संघटनेचे पदाधिकारी रंगा सतोसे यांनी यावेळी केली.

लोकांना खाजगी वाहतुकीपासून परावृत्त करून सार्वजनिक वाहतुक वापरण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. सर्व सामान्य लोकांना वेळेवर प्रवास करण्याचा अधिकार आहे. बेस्ट बसेसना मुख्य रस्त्यांवर वेगळ्या स्वतंत्र मार्गिका दिल्या पाहिजेत. सार्वजनिक जमीन ही जनतेची आहे, बिल्डरांची नाही. बेस्ट डेपोचा पुनर्विकास थांबवावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img