21 C
New York

Paris Olympics 2024 : विनेश फोगाटची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Published:

निर्भयसिंह राणे

पॅरिस 2024 ऑलिंपिकमधील (Paris Olympics 2024) सर्वात मोठ्या आश्चर्यनपैकी एक म्हणजे, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल गटात जपानच्या युई सुसाकिवर नाट्यमय विजय मिळवला. बर्सी अरेना येथील सामन्यात फोगाटने विध्यमान ऑलिंपिक चॅम्पियन आणि चार वेळ विश्वविजेत्या (2017,2018,2022 आणि 2023) विरुद्ध 3-2 असा विजय मिळवला.

युई सुसकीने 50 किलो गटात अव्वल सीडिंग आणि एक प्रबळ दावेदार म्हणून ऑलिंपिकमध्ये भाग घेतला. टोकियो 2020 ऑलिंपिकमध्ये एक उत्तम कामगिरीसह ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेनमध्ये अपराजित राहिली होती, जिथे तिने एकही गुण गमावला नाही. सुसाकिचा विक्रम आणि वर्चस्व यामुळे पॅरिसमधील सुवर्णपदकासाठी चाहत्यांमध्ये तिचीच पसंती होती.

Vinod Kambli: सचिनच्या जिवलग मित्रावर आली ही वेळ, व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

दोन्ही कुस्तीपटूनी सावध पवित्र घेतल्याने खेळात चढाओढ सुरूच राहिली. रेफरीने हस्तक्षेप करून दोघींना अधिक सक्रिय होण्याचे आव्हान केले. सामन्याच्या सुरुवातीला विणेश फोगाटच्या निष्क्रियतेमुळे सुसाकीने पहिला गुण मिळवला. जसाजसा सामना पुढे सरकत गेला तसतसे सुसाकीने फोगाटच्या बचावात्मक पवित्र्यात आणखी एक गुणसह आपली आघाडी 2-0 अशी वाढवली. अवघी दोन मिनिटे शिल्लक असताना फोगाटवर निर्णायक खेळी करण्याचे दडपण होते आणि पिछाडीवर असूनही तिने संयम राखला आणि योग्य क्षणाची वाट पहिली. मात्र अखेरच्या क्षणी फासे पालटले आणि विनेशने एक शक्तिशाली हल्ला चढवला आणि टेकडाउन करत 2-2 अशी बरोबरी साधली. कुस्तीच्या नियमानुसार, जेव्हा सामना बरोबरीत संपतो तेव्हा जय कुस्तीपटूने शेवटचे गुण मिळवले त्याला विजेता घोषित केलं जात.

सामना संपताच, रेफ्रीने विणेश फोगाटकहा हात उंचावला आणि तिच्या विजयाची घोषणा केली. जपानी संघाने या निर्णयाला तातडीने आव्हान दिले. तथापि, रिव्ह्यूनंतर, अधिकाऱ्यांनी फोगाटच्या विजयाची परूषती केली, अशा प्रकारे विनेश फोगटने महिला 50 किलो फ्रीस्टाइलमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img