21 C
New York

Vinod Kambli: सचिनच्या जिवलग मित्रावर आली ही वेळ, व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

Published:

निर्भयसिंह राणे

भारताचे माजी फलंदाज विनोद कांबळींचा (Vinod Kambli) धडपडत असल्याचा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या तब्येतीबाबत सर्व क्रिकेटप्रेमींना चिंता वाटू लागली आहे. व्हिडिओ मध्ये असे दिसते की विनोद कांबळी एका ठिकाणी चालत होते. रस्त्यावर चालत असताना त्यांनी जवळ असलेल्या दुचाकीचा आधार घेतला. त्याच्या जवळच्या लोकांनी त्यांना धडपडताना पाहिलं आणि त्यांना घरी पोहोचण्यासाठी मदत केली.

विनोद कांबळींनी 1993 ते 2000 पर्यंत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. त्यांचा शेवटचा देशांतर्गत क्रिकेट सामना 2004 मध्ये मध्य प्रदेश विरुद्धच्या फर्स्ट क्लास सामन्यात मुंबईसाठी खेळले होते, जिथे त्यांनी दोन इंनिंग्समध्ये 92 धावा केल्या होत्या. 2013 मध्ये चेंबूरहून घरी जात असताना कांबळींना हृदयविकाराचा झटका आला होता. एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेले आणि त्यांची प्रकृती त्यानंतर स्थिर झाली. त्याच्या एक वर्षांपूर्वी, त्यांच्या दोन ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांवर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

Paris Olympics 2024 : भारताचे आजचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

2010 च्या सुरुवातीला कांबळींच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तथापि, कांबळींचा सध्याचा व्हिडिओ पाहता, हे स्पष्ट होते की त्यांना पुन्हा तब्येतीचा त्रास सुरू झाला आहे. परंतु त्यांच्या आजाराचं खरा कारण अजून माध्यमांसमोर आलेलं नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img